ठाण्यात सेनेमध्ये बंडखोरी, शिंदेंच्या विरोधात अनंत तरे मैदानात

September 27, 2014 7:34 PM0 commentsViews: 1377

Image img_140652_shivsena4_240x180.jpg27 सप्टेंबर : युती तुटून दोन दिवस झाले नाही तेच ठाण्यामध्ये शिवसेनेत बंडखोरी झालीये. सेनेचे आमदार एकनाथ शिंदेंविरोधात अनंत तरे असा सामना इथं रंगणार आहे. अनंत तरेंनी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर अर्ज भरला आहे.

कोपरी पाचपाखाडीतून संदीप लेले यांनी भाजपच्या तिकीटावर अर्ज भरलाय. पण तरेंसाठी लेले आपली उमेदवारी मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे विरोधात तरे असा थेट सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेनं उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म देण्यात आले. पण अखेरीस जे व्हायचे नाही तेच झाले. आता ठाण्यात ही लढत कशी होणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close