संयुक्त राष्ट्र सभेतील मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

September 27, 2014 9:07 PM0 commentsViews: 5225

modi un speech27 सप्टेंबर : दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून होऊ शकत नाही. आम्हाला मैत्री पाहिजे मात्र पाकिस्तानला गांभीर्याने घेत नाही. काश्मीर प्रश्न सोडवण्याचं संयुक्त राष्ट्र हे व्यासपीठ नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानाचा उल्लेख न करता सुनावलं. संयुक्त राष्ट्रासारखी संस्था असताना अनेक जी समूहाची गरज काय, असं रोखठोक मतही मोदींनी मांडलं. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पहिलंच भाषण केलं. त्यांचं भाषण पूर्ण हिंदीतून होतं. या भाषणात त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी सर्व देशांनी पुढं यावं असं आवाहनही केलं.

मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे

काश्मीरचा प्रश्न UN मध्ये उपस्थित करून प्रश्न सुटणार नाही
दहशतवाद चांगला किंवा वाईट नसतो
दहशतवादाला काही देश खतपाणी घालतात
निसर्गाशिवाय विकास नको
विकास आणि निसर्ग सोबत पाहिजे
संयुक्त राष्ट्रात सुधारणा व्हावी

मोदींच्या भाषणातील इतरही ठळक मुद्दे

संयुक्त राष्ट्राकडून जगाला आशा आहे – मोदी
शेजारी देशांशी मैत्रीला प्राधान्य – मोदी
भारत जागतिक विकासात भागीदार आहे – मोदी
पाकिस्तानशी मैत्री पाहिजे पण पाकने गांभीर्यानं चर्चेसाठी पुढं यावं – मोदी
द्विपक्षीय चर्चेसाठी गांभीर्य पाहिजे – मोदी
भारत जागतिक विकासात भागीदार आहे – मोदी
जगात लोकशाहीचं वारं वाहतंय – मोदी
आम्ही खूप काही मिळवलं पण अजुन खूप काही मिळवायचं आहे – मोदी
जगात तणाव वाढतोय शांततेचा अभाव आहे – मोदी
दहशतवाद सुरू असताना चर्चा होऊ शकत नाही – मोदी
सर्वच देशांमध्ये दहशतवाद वाढतोय दहशतवादाला वेळीच आवर घाला मोदींचं जागतिक नेत्यांना आवाहन
अनेक देश दहशतवादाला प्रोत्साहन देतात – मोदी
UN असताना इतर संघटना का ? मोदींनी केला सवाल
निराशेचं वातावरण दूर केलं पाहिजे, काळानुसार बदललं पाहिजे
कुठलाही एक देश जगाचं भवितव्य ठरवू शकत नाही – मोदी
सर्वांनी मिळूनच शांतता आणि विकास शक्य – मोदी
कुछ भी होनेवाला नही, ही विचारसरणी बदला – मोदी
मतभेद विसरून दहशतवादाशी लढलं पाहिजे – मोदी
दहशतवाविरूध्द सर्वांनी एकत्र यावं – मोदी
निर्णय प्रक्रियेत सर्वांना सहभागी केलं पाहिजे – मोदी
शाश्वत विकास हाच खरा विकास – मोदी
निसर्गानुकूल विकास हे भारताचं धोरण – मोदी
सोशल मीडियाप्रमाणेच शाश्वत विकासाचा वेग वाढवा – मोदी
गरिबांच्या विकासावर आम्ही लक्षं केंद्रीत केलंय – मोदी
नरेंद्र मोदींच्या भाषणात पर्यावरण संरक्षणावर जोर
चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा फरक नसतो – मोदी
निसर्ग आणि विकास याची सांगड हवी – मोदी
नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला योग चा उल्लेख
योग हे मानवी विकासाचं व परिवर्तनाचं माध्यम – मोदी
त्यावर्षी संयुक्त राष्ट्राच्या कामाचा आढावा घेतला पाहिजे – मोदी
संयुक्त राष्ट्रात सुधारणा गरजेची – मोदी
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close