रमाबाईनगर हत्याकांडविरोधी संघर्षसमिती छेडणार आंदोलन

May 23, 2009 6:24 PM0 commentsViews: 5

23 मेरमाबाई गोळीबार प्रकरणात दोषी ठरलेल्या मनोहर कदम यांना मुंबई हायकोर्टाने जामीनावर सोडलं आहे. याबाबत आता रस्त्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा घाटकोपर रमाबाई नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. रमाबाई नगर गोळीबार प्रकरणी मनोहर कदम यांना शिवडी इथल्या फास्ट ट्रॅक कोर्टाने दोषी ठरवलं. त्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र या नंतरही हायकोर्टाने मनोहर कदम यांना जामिनावर सोडण्यात आल्याने दलित जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत घाटकोपर रमाबाई नगर हत्याकांड विरोधी संघर्ष समितीने पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी समितीचे प्रमुख शामदादा गायकवाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत न्यायालयीन पातळीवर तसंच रस्त्यावर लढा देण्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे रमाबाई नगर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी अनेक खोट्या गोष्टी केल्या त्यालाही पुन्हा वाचा फोडण्याची आम्ही तयारी केल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

close