‘आम्ही भाजपसोबतचं राहणार’, आठवलेंनी नाकारली उद्धव ठाकरेंची ऑफर

September 28, 2014 12:22 PM2 commentsViews: 3901

uddhav thakre with ramdas and vinod tawde

28 सप्टेंबर : महायुती तुटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाप्रमाणेच रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षानेही भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत आठवलेंनी आपला निर्णय जाहीर केला.

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र राहिली पाहिजे असं सांगत रामदास आठवले तुम्ही परत या, तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ असं जाहीर आवाहन उद्धव यांना रामदास आठवलेंना काल केलं होतं. त्याला उत्तर देत आठवलेंनी आपन भाजपसोबतचं राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आठवलेंच्या या निर्णयामुळे महायुतीतले इतर चारही घटक पक्ष भाजपसोबत एकत्र आले असून शिवसेना मात्र आता एकाकी पडली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shailesh

    hasanya palikade kahich urale nahi,

  • pawan

    thakre saheb hey kai bolat apan…nice joke

close