पृथ्वीराज चव्हाण म्हणजे राज्यावरचे संकट – विलासकाका उंडाळकर

September 28, 2014 4:33 PM0 commentsViews: 3064

vilaskaka patil udalkar
28 सप्टेंबर : पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रावरचे मोठं संकट असून त्यांचे राज्यातील ‘शीला दीक्षित’ करा असे खोचक विधान करत दक्षिण कराडचे विद्यमान आमदार विलासकाका उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण पैसे देऊन सभेला गर्दी जमवत आहेत असा गंभीर आरोपही उंडाळकर यांनी केला आहे.

दक्षिण कराडमधून काँग्रेसने विद्यमान आमदार विलासदादा उंडाळकर यांचे ‘तिकीट’ कापून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे नाराज झालेल्या उंडाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रविवारी उंडाळकर यांनी जाहीर सभा घेतली आणि या सभेत त्यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच टीका केली. राज्यातील अनेक नेते माझ्या काठीने साप मारु इच्छितात असे सूचक विधानही उंडाळकर यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी माझे घर उद्धवस्त करण्याचे प्रयत्न केला. मात्र जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा असून त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी पुन्हा निवडणुकीत उभा राहिलो असेही त्यांनी सांगितले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close