वाशीममध्ये आईस्क्रिममधून झाली विषबाधा : काँग्रेसचे आमदार सुरेश इंगळेसह 250 जणांना विषबाधा

May 23, 2009 6:27 PM0 commentsViews: 6

23 मे, वाशीम वाशीममध्ये लग्नाच्या स्वागत समारंभात आईस्क्रिममधून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सुरेश इंगळे यांच्यासह अडीचशे पाहुण्यांना आईस्क्रिम खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. या विषबाधा झालेल्यांना वाशीमच्या दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे. वाशीमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुभाष ठाकरे यांचा मुलगा राम यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभात आईस्क्रिममधून विषबाधा झाली आहे. काँग्रेसचे आमदार सुभाष ठाकरे यांच्या कुटुंबियांनाही आईस्क्रिममधून विषबाधा झाली आहे. त्यात लहानमुलांचा समावेश आहे. ठाकरे यांच्या मुलीचा मुलगा रुद्राक्ष सध्या उपचार घेत आहे. आईस्क्रिम खाल्ल्याने रुद्राक्षला उलट्या आणि हगवण सुरू झाली, अशी माहिती ठाकरे यांची मुलगी मीनल हिवसे यांनी दिली. ' आईस्क्रिम खाल्ल्यावर मला थोडंसं मळमळल्या सारखं झालं. नंतर जवळपास पाऊण तास उल्ट्या झाल्या, अशी माहिती सुरेश इंगळे यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना दिली

close