परभणीत झाली भारत निर्माण योजनेवरून हाणामारी

May 23, 2009 6:32 PM0 commentsViews: 2

23 मे, परभणी भारत निर्माण योजनेवरून परभणी जिल्ह्यातल्या ढेपेवाडीमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत दोघांचा मृत्यू झालाय तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये माजी सरपंच केशव फड आणि त्यांचा मुलगा मधुकर फड यांचा समावेश आहे. याप्रकरणी पिंपळदरी पोलिसांनी 27 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कुणालाही अटक करण्यात आली नाहीये. सर्वजण फरार असल्यानं पोलीस त्यांचा शोध घेतायेत. या खूनप्रकरणात सरपंचपदाबाबतचा जुनाच वाद असल्याचं बोललं जातं आहे. वाद सुरू असताना कु-हाडीने हा खून करण्यात आला आहे.

close