ओ. पन्नीरसेल्वम तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

September 28, 2014 6:35 PM0 commentsViews: 941

panneerselvam

28 सप्टेंबर : ओ पन्नीरसेल्वम यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.  डीएमकेच्या आमदारांची आज एक बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तामिळनाडूच्या आधीच्या मुख्यमंत्री जयललिता यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरूंगवासाची शिक्षा झाल्यानं पन्नीरसेल्वम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही 2001 मध्ये तानसी प्रकरणी जयललिता यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यावेळेसही सहा महिने पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री होते.

दरम्यान, उद्या सकाळी 11 वाजता तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close