डॉ. बिनायक सेन यांना सुप्रिम कोर्टाचा जामीन मंजूर

May 25, 2009 9:37 AM0 commentsViews: 4

25 मे मानवी हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.बिनायक सेन यांना सुप्रिम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. आरोग्य, शाश्वत विकास आणि मानवी हक्क यासाठी छत्तीसगडच्या दुर्गम भागात 25 वर्षांहून अधिक काळ काम करणा-या डॉ.बिनायक सेन यांना 2 वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून छत्तीसगड सरकारनं अटक केली होती. त्यांची सुटका करण्यात यावी अशी जगभरातून मागणी होत होती. 14 मे 2009 ला त्यांच्या अटकेला 2 वर्षं पूर्ण झाली. त्यादिवशी संपूर्ण भारतात त्यांच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या मानवी हक्कांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण निदर्शनं आणि मागणी केली. आज सुप्रिम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

close