राष्ट्रवादी काँग्रेसला नडला अतिआत्मविश्वास – शरद पवारांची कबुली

May 25, 2009 9:07 AM0 commentsViews: 1

25 मे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला अपयश आल्यानंतर पक्षातर्फे अशी कबुली शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिली आहे. मुंबईत मनसेमुळे सेना भाजप युतीला थोपवलं असंही पवार यांनी म्हंटलं आहे. स्वबळावर निवडणुकीची मागणी करणा-या राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना दिल्लीत काय चाललंय हे माहीत नाही, असा टोलाही शरद पवार यांनी मारलाय. निवडणुकीत काँग्रेसला एकोणीस टक्के मतं मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही एकोणीस टक्क्यांच्या आसपास मतं पडली, तरीही काँग्रेसला सतरा तर राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागाच मिळाल्या, असं का झालं याची कारणं शोधण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत पक्षाची बैठक होत असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.

close