सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आरोपामुळे विरोधकांना बळ – अजित पवार

September 29, 2014 12:06 PM2 commentsViews: 1532

Ajit pawar new

28 सप्टेंबर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आरोप केल्यामुळे विरोधकांना बळ मिळाले अशी टीकाअजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर केली. सिंचनात मी भ्रष्टाचार केलेला नाही असा दावा अजित पवारांनी केला आहे. मला मुख्यमंत्री व्हायला नक्की आवडेल अशी इच्छा अजित पवारांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत व्यक्त केली आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍या माणसाला तिथलं सर्वोच्च पद मिळवावंसं वाटतंच असंही त्यांनी IBN लोकमतशी बोलताना मान्य केलं आहे.

आघाडी तुटल्यानंतर अजित पवार यांनी प्रशासनाच्या मुद्द्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. निर्णय घेताना पारदर्शकता हवी, निर्णयाला विलंब होता कामा नये तसंच प्रशासन गतिमान असायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. जनतेशी सतत संपर्कात राहावं लागतं. अनुभव असलेल्यांचा सल्ला ऐकायचा असतो. पण पृथ्वीराज चव्हाणांनी मंत्रालयासंबंधी शरद पवारांनी दिलेला सल्ला ऐकला नाही अशी टीकाही अजित पवारांनी केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Surendra Gaikwad

    Thoditari Laaj vatudyaho…as bolayala…

  • pawan

    kalet thodi kama tumhi sudha..pan ata aaram kara

close