तीन कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदांवर द्रमुकने मानलं समाधान

May 25, 2009 9:15 AM0 commentsViews: 1

25 मे काँग्रेस आणि द्रमुकमधली खातेवाटपाची रखडलेली चर्चा अखेर पूर्ण झाली. चर्चा पूर्ण झाल्यावर नवीन सरकारमध्ये द्रमुकने सामील होण्याची तयारी दाखवली आहे. द्रमुकला तीन कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदांवर समाधान मानवं लागलं. द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्यासाठी द्रमुकचं महत्त्व काँग्रेसला पटवून देणं ही एक कसोटीच ठरली. कौटुंबीक महत्त्वाकांक्षा आणि पक्षनिष्ठा यांच्यात समतोल ठेवावा लागला. एकीकडे होते दयानिधी मारन, अझागिरी आणि कानिमोझी तर दुसरीकडं होते पक्षाचे निष्ठावंत नेते ए. राजा आणि टी. आर. बालू. शेवटी ए. राजा यांना माहिती तंत्रज्ञान, अझागिरी यांना खते आणि रसायन आणि दयानिधी मारन यांना टेक्स्टाईल खातं द्यायला करुणानिधींनी तयारी दाखवली. टी. आर. बालू यांना लोकसभेचे उपसभापती केलं जाण्याची शक्यता आहे. कानिमोझी यांना महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही चर्चा एका अधिकार्‍यानं यशस्वी केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी दोन वेळा भेटले आणि तोडगा निघाला. पण, सरकारमध्ये सहभागी होत असल्याची अधिकृत घोषणा द्रमुक अजून करणार आहे. शेवटच्या क्षणी कोणताही धक्का बसणार नाही, अशी काँग्रेसला आशा आहे.

close