नव्या मंत्रिमंडळातले मंत्री झाले कामावर रूजू

May 25, 2009 9:31 AM0 commentsViews:

25 मे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहा ज्येष्ठ मंत्र्यांनी आज त्यांच्या पदाची सूत्रं हाती घेतली. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा, गृहमंत्री पी. चिदंबरम, संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी, कृषिमंत्री शरद पवार आणि रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यात समावेश आहे. प्रणब मुखर्जी यांना 31 जुलैपूर्वी बजेट सादर करायचंआहे. त्यांच्या बजेटकडून सर्वच क्षेत्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. एस. एम. कृष्णा यांनी मुंबई हल्ल्याचा मुद्दा आपल्या अजेंड्यावर सर्वात वर ठेवला आहे. त्यांच्याकडून दोषींना शिक्षा होण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवला जाण्याची शक्यता आहे. तसंच श्रीलंकेतल्या तामिळींचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. गृहमंत्री पी. चिदंबरम दहशतवाद आणि नक्षलवादाच्या मुद्द्याला प्राधान्य देतील. त्यासाठी पोलीस दलाला अत्याधुनिक करणं, गुप्तचर संस्था बळकट करणं, अशा गोष्टींवर त्यांना भर द्यावा लागणार आहे.

close