पोलीस कर्मचार्‍यांना सेवेत रूजू करण्याचे सुप्रिम कोर्टाचे मायवतींना आदेश

May 25, 2009 9:48 AM0 commentsViews: 1

25 मे मायावती यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. 2007 मध्ये मायावती सरकारनं बरखास्त केलेल्या 18 हजार पोलीस कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. मुलायमसिंग मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात ही पोलीस भरती करण्यात आली होती. मात्र नंतर सरकार बदलल्यावर मायावतीने पोलिसांच्या बदल्या केल्या होत्या. आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे आणि पोलिसांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.

close