अनंत तरे नरमले, शिवसेनेत परतले

September 29, 2014 7:03 PM0 commentsViews: 3849

anant tare29 सप्टेंबर : ठाण्यात शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बंड पुकारणारे शिवसेनेचे उपनेते अनंत तरे आता नरमले आहे. अनंत तरे पुन्हा शिवसेनेत परतले आहे.

आज (सोमवारी) अनंत नरे यांनी ‘मातोश्री’ वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव यांनी तरेंची समजूत काढली. तसंच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जरी देण्यात आली नाही मात्र विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात येईल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी तरे यांना दिलं. उद्धव यांच्याकडून आश्वासन मिळाल्यामुळे समाधान झाल्याचं अनंत तरे यांनी सांगितलं. विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे तरे यांनी सेनेविरोधात बंड पुकारले होते. तरे यांनी भाजपकडून अर्जही भरला होता. मात्र तरे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तांत्रिक कारणावरून अर्ज फेटाळला गेला होता. अखेरीस ‘मातोश्री’वर उद्धव यांच्यासोबत भेट झाल्यानंतर तरे यांनी बंड मागे घेतले आणि शिवसेनेत पुन्हा दाखल झाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close