भारतासाठी सोनियाचा दिनु…

September 29, 2014 9:46 PM0 commentsViews: 620

saniya mirjha29 सप्टेंबर : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतासाठी आज सोनेरी दिवस ठरला. भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. थाळीफेकमध्ये सीमा पुनियाने 61.03 मीटरची थाळीफेक करत सुवर्णपदक पटकावलं. तर टेनिस मिक्स्ड डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं सुवर्णपदक पटकावलंय.

दोन वेळा एशियन गेम्स मेडलिस्ट असलेल्या कृष्णा पुनियाला मात्र मेडल पटकावता आलं नाही. टेनिसमध्ये मिक्स डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीने कमालीचा खेळ करत चायनीझ तायपेई जोडीचा पराभव केला आणि भारतासाठी सहावं सुवर्णपदक पटकावलं.

याअगोदर दिवसभरात भारताच्या नरसिंग यादव, बजरंग या कुस्तीपटूंनी तर सनम सिंग आणि साकेतनं डबल्समध्ये रौप्य आणि कास्यपदकाची कमाई केली. भारताच्या खात्यात आता एकूण सहा सुवर्णपदकांचा समावेश झालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close