बार्शीच्या प्रार्थनाची कास्यपदकाला गवसणी

September 29, 2014 11:11 PM0 commentsViews: 346

27 सप्टेंबर : इंचिऑनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बार्शीच्या कन्येनं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. टेनिसच्या महिला दुहेरीच्या सामन्यात बार्शीच्या प्रार्थना ठोंबरे आणि सानिया मिर्झा या जोडीने भारताला कास्यपदक मिळवून दिलंय. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. बार्शीकरांसाठी ही अभिमानस्पद गोष्ट आहे. सानिया मिर्झाने जो तिच्यावर विश्वास दाखवला त्या बळावर तिने ही भरारी घेतली. आशियाई स्पर्धेत तिचं हे पहिलं यश आहे तिने असंच यश संपादन करत राहावं अशी भावना प्रार्थनाची आई वर्षा ठोंबरे यांनी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close