मनसेच्या बहुचर्चित ब्ल्यू प्रिंटमध्ये शुद्धलेखनाच्या शेकडो चुका!

September 30, 2014 10:27 AM7 commentsViews: 2946

Blue print MNS

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

30 सप्टेंबर : मराठीच्या मुद्यावर राजकारणात उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच प्रसिद्ध केली. पण या ब्ल्यू प्रिंटच्या पुस्तिकेत शुद्धलेखनाच्या तब्बल 250च्यावर चुका आहेत.

मराठीच्या शुद्धलेखनाची ऐशीतैशी करणारी ही पुस्तिका कुणा अमराठी उमेदवाराची नाही तर ही आहे मनसेची ब्ल्यू प्रिंट आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आगमन होताच पक्षाचे कार्यकर्ते मराठी मनाचा मानबिंदू असं बिरुद लावत राज ठाकरे यांचं स्वागत करतात. याच मनसेनं आपली बहुचर्चित ब्ल्यू प्रिंट तब्बल 9 वर्षांनी जाहीर केली. पण 9 वर्षं ज्या ब्ल्यू प्रिंटचं काम सुरू होतं त्या 90 पानी पुस्तिकेत शुद्धलेखनाच्या शेकडो चुका आहेत. काना, मात्रा, वेलांटी, र्‍हस्व, दीर्घ एवढंच नाही तर ब्ल्यू प्रिंटमध्ये चक्क हिंदी शब्दांचा वापर करण्यात आला आहे.

वीज माफी देतो म्हणून काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. पण सत्तेवर येताच प्रिंटिंग मिस्टेक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हात वर केले. असंच काहीसं मनसेच्या बाबतीत होणार नाही ना होणार असा प्रश्न या ब्ल्यू प्रिंटच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • ketan

  चांगल्या कामात चुका शोधानारेही पाहिजेत

 • ketan

  चांगल्या कामात चुका शोधानारेही पाहिजेत

 • Mayur Divate

  आपली मजल शुद्ध लेखना पर्यंतच !!
  आपण मिडिया वाले पण त्यांचा विकासा योजने विषयी नाही बोलू शकत उलट चुका शोधत बसताय.
  ब्रेंकिंग न्यूजचे धनी !!!

 • sagar

  meaning is important….
  all is well

 • Prasad Madkaikar

  Tell me that IBN Lokmat has never had a printing mistake on its website. You call yourself the No. 1 Marathi news chanel. Firstly the word “Number” is an english word. The correct word is “Kramank”.
  So stop bullshitting and criticizing for the sake of criticizing.

 • Prashant Shirke

  Gramatical chuka shodhnya peksha, je changla aahe tyala prasidhi dya.

 • Ravi

  Very Fake Person Raj Thackeray is.. thinking people are idiot,,,, he is big cheater

close