दापोलीमध्ये माशांचे दर घटल्यामुळे मच्छीमार अडचणीत

September 30, 2014 2:13 PM0 commentsViews: 462

30 सप्टेंबर :  मासेमारी म्हणजे कोकणातला प्रमुख व्यवसाय, कोकणाचा आर्थिक कणा म्हणून मासेमारी ओळखली जाते. यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं परकीय चलन मिळतं. मात्र सध्या मच्छीचे दर घटल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात सुमारे 2 हजार बोटी मच्छीमारी करतात. नव्या हंगामाच्या सुरुवातीला वादळसदृश परिस्थितीमुळे मच्छीमारी ठप्प होती. पाऊस थांबल्यानंतर मासेमारी सुरू झाली. सुरमई, पापलेट, माकूल, कटल, कोळंबी या माशांमुळे परकीय चनल मुबलक प्रमाणात मिळतं. पण परदेशात मागणी घटलीये असं सांगून एजंट कमी दरानं मच्छी विकत घेत असल्याचा आरोप मच्छीमार करताहेत. विक्री कमी झाल्यामुळे मच्छीमार अडचणीत सापडलेत.

माशांचे दर (प्रति किलो)

 • सुरमई – 200 रु.
 • तवर – 200 रु.
 • पापलेट – 400/600 रु.
 • गोबरा – 100 रु.
 • कोळंबी व्हाइट – 500 रु.
 • कोळंबी टायगर – 600 रु.
 • कोळंबी – 150 रु.
 • लहान कोळंबी – 50 रु.
 • बगा – 100 रु.
 • माकूल – 90 रु.
 • कटल – 150 रु.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close