फीवाढीला हायकोर्टाचा लगाम

May 26, 2009 11:18 AM0 commentsViews: 2

26 मे खाजगी शाळांच्या फीवाढीला लगाम घालण्यासाठी शिक्षण शुल्क नियंत्रण समिती नेमण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. 30 जूनपर्यंत ही समिती नेमली जाणार आहे. या समितीच्या परवानगीशिवाय कोणत्याही शाळेला यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी फीवाढ करता येणार नाही. शाळेच्या बेबंद फीवाढीवर ही समिती तरी लगाम घालू शकेल का ? अशी चिंता आता पालकांना वाटतेय.

close