नांदेडमध्ये 3 मतदारसंघात तब्बल 246 उमेदवार रिंगणात

September 30, 2014 5:38 PM0 commentsViews: 1351

56election_counting30 सप्टेंबर : उमेदवारी दाखल करण्याच्या बाबतीत नांदेड जिल्ह्यातील तीन मतदार संघात विक्रम झालाय. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक उमेदवार नांदेड जिल्ह्यातल्या तीन मतदार संघात आहेत. 9 मतदार संघात एकूण 451 जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यापैकी नांदेड दक्षिण मतदारसंघात 91 जणांनी उमेदवारी दाखल केली.

त्या पाठोपाठ नांदेड उत्तर मतदारसंघात 80 आणि भोकर विधानसभा मतदारसंघात 75 जणांनी उमेदवारी दाखल करुन वेगळा विक्रम प्रस्तापित केलाय. उमेदवारांच्या या विक्रमी संख्येमुळे मात्र निवडणूक विभागाची पंचाईत झाली. मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त चार ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र लावता येतात.

एका मशीनवर एकूण 16 बटन असतात. नोटाचं एक बटण वगळता 15 उमेदवार मावतात. याप्रमाणे चार मशीन्सवर 63 उमेदवारांची मर्यादा आहे. 63 पेक्षा जास्त उमेदवार राहिल्या मतदानासाठी ईव्हीएम मशिन्स ऐवजी बॅलेट पेपर चा वापर करावा लागणार आहे. नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर आणि भोकर या तीन मतदारसंघात जर 63 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर जुन्या पद्धतीने मतपुस्तिकेवर मतदान प्रक्रिया घ्यावी लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close