राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी, चव्हाणांचे टीकास्त्र

September 30, 2014 7:34 PM0 commentsViews: 1512

cm on ncp30 सप्टेंबर : आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेसनेच तोडली आणि राष्ट्रवादीने भाजपशी छुपी हातमिळवणी केली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं पाप हे राष्ट्रवादीचंच आहे असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तुळजापूरमध्ये आज (मंगळवारी) काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला. या सभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपवर एकच हल्लाबोल केला.

राष्ट्रवादीचा जन्ममुळातच वैयक्तिक महत्वकांक्षेपोटी झाला. 1999 साली पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा आणि आता 2014 साली
मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा यासाठी आमची मैत्री तोडली. मुळात मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेसाठीच राष्ट्रवादीने आघाडी तोडली अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसंच लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपची जाहिरातच चांगली होती. ‘अच्छे दिन’ येणार असं मोदींनी सांगितलं पण कुठे आहे ‘अच्छे दिन’ असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. यासभेत काँग्रेसचे प्रचारसमितीचे प्रमुख नारायण राणे यांनी तुफान टोलेबाजी केली. मोदींची भाषणं म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट आहे. ते जिथे जाता तिथे हिंदीत भाषण करता कारण त्यांना इंग्लिश येत नाही असा टोला नारायण राणेंनी लगावला. युती तोडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरलेले देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदाची क्षमता तरी आहे का ? असा टोलाही राणे यांनी फडणवीस यांना लगावला. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, मोहन प्रकाश हे नेतेही उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close