पवनराजे निंबाळकर खूनप्रकरणी दोघांना अटक

May 26, 2009 1:03 PM0 commentsViews: 100

26 मे पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचनं पारसमल जैन आणि दिनेश तिवारी या दोघांना अटक केली आहे. या हत्येसाठी आपल्याला 30 लाख रुपयांची सुपारी मिळाली होती अशी कबूली आरोपींनी पोलिसांना दिली. या प्रकरणात दिनेश तिवारीने पवनराजेंवर गोळीबार केला होता. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे असल्याने क्राइम ब्रांचने आरोपींना सीबीआयच्या ताब्यात दिलं आहे. 3 जून 2006 रोजी कळंबोलीत पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काजी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अनेक राजकीय व्यक्तींचा हात या प्रकरणात असल्याचं त्यावेळी बोललं जात होतं.

close