सलग 5 दिवस बँका असणार बंद, शिल्लक पैसे काढून घ्या !

September 30, 2014 10:14 PM0 commentsViews: 3001

atm thif30 सप्टेंबर : येत्या आठवड्याभरात जर तुम्ही काही खरेदी करण्याच्या विचारात असला तर तुमच्या खरेदीत विघ्न येऊ शकतं. तुम्हाला पैशांची आवश्यकता भासणार असेल तर आताच एटीएममधून लवकरात लवकर पैसे काढून घ्या. कारण या आठवड्यात सलग पाच दिवस सुट्‌ट्या येत असल्यामुळे बँका बंद असणार आहे. त्यामुळे एटीएम मशीनमध्ये खटखडाट होण्याची शक्यता आहे.

बँकांचं आज 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला अर्धवार्षिक क्लोजिंग होतंय. त्यामुळे उद्याच दिवस बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे बँका बंद राहणार आहे. त्यामुळे एटीएममध्येही खडखडाट होण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबर अर्थात गुरुवारी गांधी जयंती, शुक्रवारी दसरा आणि सोमवारी ईदची सुटी आल्याने बँका आता थेट मंगळवारी कामकाजासाठी खुल्या होणार आहेत. फक्त शनिवारीच बँका अर्धा दिवस सुरू राहणार आहे. सलग सुट्‌ट्यामुळे बँका बंद असल्यामुळे एटीएम हाच एक पर्याय राहणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पैशांची चणचण भासण्याअगोदर शिल्लक पैसे काढून घेतले बरे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close