तळवणेच्या गावकर्‍यांचा मायनिंगला तीव्र विरोध

May 26, 2009 1:16 PM0 commentsViews: 2

27 मे, सावंतवाडीकळणे गावाप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावचे गावकरीही मायनिंगच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तळवणे गावातील शेतकरर्‍यांची बागायती जमीन 27 वर्षापूर्वी एका मायनिंग कंपनीने लीजवर घेतली होती. पण याबाबत महसुल विभागानं गावकर्‍यांना अंधारात ठेवून फसवणूक केली अशी तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. तळवणे गावातील अनेक शेतकर्‍यांचे संसार बागायतीवर चालतात. लीज असल्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीत काहीच करता येत नाही. सात बारावरच्या या बेकायदेशीर लीजबाबत तेथील सरपंचानी प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागितली पण प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे. लीज रद्‌द् न झाल्यामुळे मायनिंग केव्हाही सुरू होईल, अशी टांगती तलवार शेतकर्‍यांवर राहणार आहे.

close