महादेव जानकर ‘चव्वनी’ छाप नेते – शिवसेना

October 1, 2014 10:06 AM5 commentsViews: 6547

Uddhav thakre jankar01 ऑक्टोबर :  पक्ष तिरडीवर गेला तरी चालेल, पण आम्हाला पदांचे गूळ-खोबरे मिळाले तरच समाजाचे कल्याण होईल असे घटक पक्षाच्या नेत्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी महादेव जानकरांवर केली आहे. महायुती तुटल्यानंतर शिवसेनेने महायुतीतल्या घटक पक्षांवर आता निशाणा साधला जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांवर टीका करण्यात आली आहे. त्यामध्ये महादेव जानकरांचा ‘चव्वनी’ छाप नेते असा उल्लेख करण्यात आला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजपासोबत गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी यापूर्वी ‘सामना’मधून आठवले आणि आता जानकरांना लक्ष केलं आहे.

शिवसेना आता एकाकी पडली आहे, सेनेची कोंडी झाली आहे, या चर्चेत तथ्य नाही. घटक पक्षाचे नेते गेले तरी सारा बहुजन समाज हा परंपरेने शिवसेनेबरोबरच आहे असा विश्वासही ठाकरेंनी या अग्रलेखात व्यक्त केला आहे. मात्र भाजपासोबत गेलेल्या ‘चव्वनी’ छाप पुढार्‍यांच्या हाती नक्की काय लागले? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. जानकरांच्या हातात भाजपाने पाचेक पडीक जागा ठेवल्या आहेत, यामुळे जानकर संतापले असले तरी आपण समाधानी आहोत, असेच ते दाखवत आहेत. स्वत:ला पदे मिळाली की समाजाचे कल्याण होईल असे वाटणार्‍या नेत्यांची मिरासदारी या निवडणुकीत मोडल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

काय म्हटलंय अग्रलेखात?
शेवटी आठवल्यांसारखाच अनुभव जानकरांनाही आलाच ना ? आठवल्यांना दिलेल्या जागांवरही भाजपने स्वत:चे उमेदवार घुसवले. जानकरांचेही तेच झाले. पक्ष तिरडीवर गेला तरी चालेल, पण आम्हाला पदांचे गूळ- खोबरे मिळाले तरच समाजाचे कल्याण होईल असे घटक पक्षाच्या नेतेमंडळींना वाटत आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजपबरोबर पळून गेल्याने शिवसेनेची कोंडी झाली. शिवसेना एकाकी पडली असे बोलले जात आहे. त्यात अजिबात तथ्य नाही. घटक पक्षाचे नेते गेले, तरी सारा बहुजन समाज हा परंपरेने शिवसेनेबरोबरच आहे हे निवडणूक निकालांतून स्पष्ट होईल. पुन्हा स्वत:ला आपापल्या समाजाचे नेते म्हणवून घेणार्‍या ‘चव्वनी’ छाप पुढार्‍यांच्या हाती, नक्की काय लागले? हा संशोधनाचाच विषय आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • VINOD

  agodar konalach kalale nahi ka hey nete chavanni chaap aahet te……………..ashana mag ka thara dila hota……………….faar kathin aahe rajkaran samajane…………matadarano savadh vhaa aani matadaan kara yogya cadidate nivada…….

 • Nishikant Rastogi

  Morarji Desai, a Gujarati and the then chief minister of Bombay state, ordered the police to open fire on Samyukta Maharashtra agitators in which scores of people died. When Maharashtra came into being on May 1, 1960, Bombay was its capital.

  While the Maharashtrians chanted ‘Mumbai aamchi, nahi kaunachya bapachi (Mumbai is ours, not anyone’s father’s),’ the Gujaratis countered it with, ‘Mumbai tumchi, bhandi ghasa aamchi (Mumbai is yours, but do our house work).’

 • Nishikant Rastogi

  Dhokla Maango – fafra denge, Maharashtra mango, jhapda denge.

 • Nishikant Rastogi

  Adil Shah aale, Nizam Shah aale, haa Amit Shah koun?

  SHAME on BJP.

 • अहिल्या सेना महाराष्ट्र

  महादेव जानकर
  ‘चव्वनी’ छाप नेते आहेत हे आता समजले काय मग आगोदर खांद्याला खांदे लाउन फिरत होता तेव्हा काय झोपला होता माणसाच्या पाया खालची वाळु सरकली की मग काय पण बरळत सूटतो

close