दसरा भेट, पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त

October 1, 2014 2:17 PM0 commentsViews: 557

petrol price hike01 ऑक्टोबर : पेट्रोलचे दर 65 पैशांनी कमी करून सरकारनं सर्वसामान्यांना दसर्‍याची भेट दिलीय. दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला हा एक दिलासाच म्हणता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानं तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच गेल्या वर्षभरापासून डिझेलचे दर प्रतिमहिना वाढता वाढत आहे. आता डिझेलच्या दरात कपात करण्याची हालचाल सुरू आहे. डिझेलचे दर कमी करण्याविषयीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्‍यावरून परतल्यानंतर घेणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close