मोदी लाट आहे ना, मग सभा कशासाठी ? -उद्धव ठाकरे

October 1, 2014 4:27 PM0 commentsViews: 2180

uddhav on narendra modi sabha01 ऑक्टोबर :…जर लाट आहे, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांची आवश्यकता का भासली असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला केलाय. हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली युती जागांच्या मुद्यावर का तुटली, असंही ठाकरे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

निवडणुकीला आता खर्‍या अर्थानं रंग चढू लागलाय. कालचे मित्र आजचे वैरी झाले आहेत. शिवसेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर विखारी टीका सुरू केलीये. गेल्या 25 वर्षात भाजप पहिल्यांदाच आपला साथीदार शिवसेनेशिवाय निवडणुकीला सामोरी जातोय. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता जिंकून येण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. महाराष्ट्रात भाजपच्या प्रचाराची भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांवरच असणार आहे. 10 दिवसांत मोदींच्या 22 सभांचं लक्ष्य भाजपनं ठेवलंय. 4 ऑक्टोबरपासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत मोदींच्या सभा होणार आहेत. याच मुद्यावर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. आजपर्यंत मी कधी हे पाहिलं नाही की पंतप्रधान एखाद्या राज्यात इतक्या सार्‍या सभा घेतात. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात माझी कुठलीही तक्रार नाही, आजही मी त्यांना नरेंद्र भाई म्हणतो आणि हे राजकीय नाही तर व्यक्तिगत मत आहे. पण मला भाजपला हे विचारण आहे की, जर मोदी लाट आहे तर मग इतक्या सभा का घेण्याची आवश्यकता का पडत आहे. 10 सभा घ्या किंवा 8 सभा घ्या पण पंतप्रधानांना इतक्या सभा घेण्याची गरज काय ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच युती का तुटली हे मला अजूनही कळलेलं नाही, भाजपवर टीका करायला लागू नये, अशी माझी इच्छा आहे, असंही उद्धव म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close