अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाईत अडथळा आणणार्‍या नगरसेवकाला अटक

May 26, 2009 2:02 PM0 commentsViews: 3

26 मे, नवी मुंबईअनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरु असताना अडथळा आणून गोंधळ घालणार्‍या नगरसेवकाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वाशी गावात अनधिकृत बांधाकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोच्या वतीने कारवाई करण्यात येत होती. कारवाई चालूअसताना कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न कॉगे्रसचे नगरसेवक दशरथ भगत यांनी केला.वाशी गावातल्या 40 टक्के प्रकल्पग्रस्त लोकांना साडे बारा टक्के भुखंडाचं वाटप सिडको कडून व्हायचं होतं पण भुखंडाचं वाटप नझाल्यामूळे प्रकल्पग्रस्त लोकांनी सिडकोच्या जागेवर घरं बांधली होती. कारवाईपूर्वी नोटीस दिली नाही म्हणून नगरसेवक दशरथ भगत तिथे विरोध करत होते.

close