अमरनाथ यात्रा 7 जूनपासून

May 26, 2009 2:31 PM0 commentsViews: 189

26 मे, श्रीनगर अमरनाथ यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय अमरनाथ देवस्थान समितीने घेतला आहे. यापुर्वी समितीने जाहीर केलेल्या 15 जून या तारखे ऐवजी 7 जूनपासून यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 3,880 मीटर उंचावर असलेल्या अमरनाथ गुहेकडे जाणार्‍या पेहेलगाम आणि बाटला या दोन्ही ठिकाणी मदत छावण्या उघडण्यात येणार असल्याची माहितीही दिली समितीने दिली आहे. राज्यपालांनी नेमलेल्या एका समितीने यंदा बर्फ वृष्टी लवकर होण्याचा अंदाज वर्तवल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं समितीतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. या काळात गुहेकडे जाणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. त्यामुळे अनेक यात्रेकरूंना अडचणींना सामोरे जावे लागते. यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, म्हणून या तारखा बदलण्याचा निर्णय घेतल्याचं अमरनाथ देवस्थान समितीच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

close