असं आहे व्हाईट हाऊस…!

October 1, 2014 11:29 PM1 commentViews: 985

अजय कौटिकवार, मुंबई

01 ऑक्टोबर : व्हाईट हाऊस….अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थान…जगातलं सर्वात शक्तिशाली सत्ताकेंद्र…हे व्हाईट हाऊस आतमधून आहे तरी कसं..अध्यक्षांची सिक्रेट रूम…कॅबिनेट रूम…तसंच व्हाईट हाऊसचं किचन गार्डन अशा या व्हाईट हाऊसची ही एक खास सफर.

जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांच्या निवासस्थानांमध्ये सर्वाधिक चर्चेत असतं ते व्हाईट हाऊस. अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थान. जगाच्या इतिहासाला वळण देणारे अनेक निर्णय याच ठिकाणी होत असतात. व्हाईट हाऊसचा इतिहासही तेवढाच रोचक आहे.

अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी या जागेची निवड केली आठ वर्षात ‘प्रेसिडंट हाऊस’ बांधुन तयार झालं. 1814 मध्ये
ब्रिटिशांनी लावलेल्या आगीत प्रेसिडंट हाऊसचं प्रचंड नुकसानं झालं. त्याच्या काही खुणा व्हाईट हाऊसमध्येअजुनही जपून ठेवल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी अमेरिका भेटीवर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी याबद्दल माफीही मागितली. 1902 मध्ये अध्यक्ष रूझवेल्ट यांनी व्हाईट हाऊसचा कायपालट केला आणि प्रेसिडंट हाऊसचं नामकरण झालं.व्हाईट हाऊस.

कसं आहे व्हाईट हाऊस
व्हाईट हाईसमध्ये 132 खोल्या असून
अध्यक्षांसाठी 6 प्रकारची निवासस्थानं
प्रशस्त डायनिंग रूम
1000 जणांना शाही खाना देण्याची व्यवस्था

अध्यक्षांसाठी विविध प्रकारची 6 निवासस्थानं आहेत. व्हाईट हाईसच्या डायनिंग रूममध्ये 1000 जणांना शाहीखाना देण्याची व्यवस्था आहे. व्हाईट हाऊसची रचना करताना प्रत्येक बारिक सारिक गोष्टींचा विचार करण्यात आलाय. इथल्या सुरक्षा रक्षकांनाही शिष्टाचाराचं खास ट्रेनिंग देण्यात आलंय.

व्हाईट हाऊसमध्ये सर्वाधिक महत्व आहे ते कॅबिनेट रूम आणि सिच्युएशन रूमला..याच सिच्युएशन रूममध्ये अतिशय गोपनिय प्लॅन्स आखले जाते आणि त्यावर नियंत्रण ठेवलं जातं. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकेच्या सर्वात धाडसी मोहिमेवर ओबामांनी याचं रूम मध्ये बसून लक्षं ठेवलं होतं.

व्हाईट हाऊसमध्ये जगभरातल्या नेत्यांचा राबता असल्यानं इथलं किचनही खास आहे. इथं येणार्‍या पाहुण्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मेन्यु बनवला जातो आणि यासाठी भाजी आणि फळं आणि मध याचा पुरवठा होतो तो व्हाईट हाऊसमधल्या किचन गार्डन मधून. फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांचं या गार्डनंवर खास लक्षं असतं. त्यामुळेच व्हाईट हाऊसमध्ये येणारे देशोदेशीचे राष्ट्रप्रमुख या आदरातिथ्यानं भारावून जातात.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sandesh Kamtalwar

    Sir,Nice white house video with precious information in very short time duration.

close