डॉ. बिनायक सेन यांची रायपूर जेलमधून सुटका

May 26, 2009 2:48 PM0 commentsViews: 4

26 मे, छत्तीसगड मानवी हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनायक सेन यांची आज सुटका करण्यात आली. सेन यांना सोमवारी सुप्रिम कोर्टानं जामीन मंजुर केला. सुटका झाल्यानं आनंद वाटला, पण का अटक करण्यात आली होती ते मात्र माहित नाही अशी उपरोधात्मक प्रतिक्रिया सेन सुटल्यावर व्यक्त केली. आपण सत्यासाठी आणि शांतीसाठी सतत संघर्ष करत राहू तसंच सलवा जुडूम सारख्या सरकारच्या मोहीमांना आपला विरोध कायम राहिल असंही सेन यांनी म्हटलं आहे. आरोग्य ,शाश्वत विकास आणि मानवी हक्क यासाठी छत्तीस गढच्या दुर्गम भागात 25 वर्षाहुन अधिक काळ काम करणार्‍या डॉ.बिनायक सेन यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन छत्तीसगढ सरकारन अटक केली होती.त्यांची सुटका व्हावी अशी मागणी जगभरातुन होत होती. 14 मे 2009ला त्यांच्या अटकेला दोन वर्ष पुर्ण झाली. आणि आज बरोबर 2 वर्ष 12 दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली.

close