अयला चक्रीवादळाच्या तडाख्यात पश्चिम बंगालमध्ये 49 जणांचा मृत्यू

May 26, 2009 3:28 PM0 commentsViews: 4

26 मेसोमवारी पश्चिम बंगाल मध्ये आलेल्याअयला या चक्रीवादळाच्या तडाख्यात 49 जणांचा मृत्यू झाल्याची पीटीआयची माहिती आहे. मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी वादळाचा फटका बसलेल्या जिल्हयांना भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य पुरवण्याचे आदेश दिले आहेत. आपत्तीग्रस्त भागामध्ये हेलीकॉप्टरच्या मदतीने अन्न व पाणी पुरवण्याचे काम लष्कर करत आहे. अयला वादळामुळे ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडला. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांसह मणिपूर, मेघालय आणि नागालँडलाही या पावसाचा तडाखा बसला. हा मुसळधार पाऊस कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान अंदमानच्या किनार्‍यावर आलेला मान्सून आता केरळपर्यंत पोहचला आहे. हवामानखात्याच्या अंदाजापेक्षा आठवडाभर आधीच मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केलाय. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागातही मान्सूनचं आगमन झालं आहे.

close