बजेट जुलैच्या पहिल्या आठवड्यात – प्रणव मुखर्जी

May 26, 2009 3:44 PM0 commentsViews: 1

26 मे, दिल्लीनव्या सरकारचं पहिलं बजेट जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केलं जाईल तसंच जुलैअखेरीस हे बजेट पास करण्याची प्रक्रिया होईल अशी माहिती नवनियुक्त अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली. नेटवर्क 18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. आर्थिक वाढ आणि विकासदर कायम राखण्यावर आपला भर राहील असंही ते यावेळी म्हणाले.अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील तसंच देशाची प्रगती आणि आर्थिक विकास या दोन्ही गोष्टींना प्राधान्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पुन्हा एकदा चांगले दिवस यावेत यासाठी आवश्यक ते उपाय सरकार जरुर करेल असंही मुखर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.

close