गुजरात दंगलीप्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथकाचं काम सुरु

May 26, 2009 4:19 PM0 commentsViews: 9

26 मे, अहमदाबादगुजरात दंगलीची दंगलीप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह इतरांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे. या पथकानं आपलं काम मंगळवारी सुरू केलं. दंगलीत मोदींचा हात होता का याची चौकशी हे पथक करेल. पण नरेंद्र मोदींची याप्रकरणी चौकशी होईल का याबाबत अधिकारी स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत. गुजरातमध्ये गोध्रा प्रकरणानंतर उसळलेल्या दंगलीत नरेंद्र मोदींचा हात आहे का याची चौकशी करण्यासाठी सुप्रिम कोर्टानं विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. आता या पथकानं आपलं काम सुरू केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर 63 जणंची चौकशी या पथकानं सुरू केली आहे. या पथकानं आज मोदी आणि इतरांविरोधात याचिका दाखल करणार्‍या झाकीया जाफरी यांच्याशी चर्चा केली. झाकीया या माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी आहेत. एहसान जाफरी यांचा गुलबर्ग सोसायटीत झालेल्या हत्याकांडात मृत्यू झाला होता. जाफरी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, इतर मंत्री, अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची दंगलप्रकरणी चौकशी करण्यासाठी याचिका केली आहे.' विशेष पथकाबरोबर माझी पहिली मिटींग होती. दंगलखोरांना कोणतीही आडकाठी करु नये असे आदेश मोदींनीच पोलिसांना दंगलीच्या काळात दिले होते याविषयी मी विशेष पथकाला माहिती दिली ' असं झाकिया जाफरी यांनी सांगितलं. तर सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी मोदी आणि इतरांवरचे आरोप सिद्ध होतील अशी खात्री आहे असं म्हटलंय.मोदींना चौकशीसाठी बोलावण्यात येईल का यावर बोलण्यास अधिकारी तयार नाहीत. ' गरज पडली तर आम्ही मोदींची चौकशी करु तसंच सुप्रिम कोर्टाने दिलेले आदेश पाळले जातील ' असं विशेष तपास पथकाचे प्रमुख आर. के. राघवन यांनी तपासासंबधी म्हटलंय.27 एप्रिल 2009 रोजी कोर्टानं मोदींसह 63 जणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गुजरात दंगलीतील नऊ महत्त्वाच्या प्रकरणांसाठी येत्या काही दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टसही सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी विशेष तपास पथकाची तयाराही सुरू झाली आहे.

close