चक दे इंडिया, पाकला धूळ चारत भारतीय हॉकी टीमने लुटलं ‘सोनं’

October 2, 2014 5:42 PM0 commentsViews: 1222

indian hocky team
02 ऑक्टोबर : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी टीमने दसर्‍याच्या आधी ‘सोनं’ लुटलंय. भारतीय हॉकी टीमने पाकिस्तानाचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा नेहमीचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानाला धूळ चारत भारतीय टीमने दणदणीत विजय मिळवलाय. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या फायनल मॅच बरोबरी साधली होती. त्यानंतर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय टीमने 4-2 ने पाकचा पराभव केला. फायनल मॅचमध्ये तब्बल 48 वर्षांनंतर भारताने हा शानदार विजय मिळवलाय.

इंचिऑनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय हॉकी टीमनं तब्बल 16 वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावलंय. या कामगिरीबरोबरच टीम इंडिया 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठीही क्वालिफाय झाली आहे. तब्बल 48 वर्षांनंतर फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. निर्धारित वेळेत दोन्ही टीम्सनं 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे ही मॅच पेनल्टी शूटआऊटमध्ये गेली. पण पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा गोलकिपर श्रीजेशनं कमालीची कामगिरी केली. श्रीजेशने 3 अप्रतिम सेव्ह केले. याबरोबरच भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 नं विजय मिळवला. आशियाई क्रीडा स्पर्धेमधील भारताचं हे तिसरं सुवर्णपदक ठरलंय. या सुवर्णपदकासह भारताच्या खात्यात नऊ सुवर्णपदक जमा झाले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close