लाहोरमध्ये स्फोट : 35 ठार, 400 जखमी

May 27, 2009 7:01 AM0 commentsViews: 2

28 मे पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज झालेल्या आत्माघातकी बॉम्बस्फोटात 35 जण ठार झाले असून जखमींची संख्या 400वर पोहोचली आहे. काल सकाळी साडेदहाच्या सुमारास लाहोरच्या माल रोड भागात लाहोर पोलीस कंट्रोलरूमवर अतिरेक्यांनी हा स्फोट घडवून आणला. लाहोरमधलं आयएसआयचं ऑफिस अतिरेक्यांनी टार्गेट केलं असल्याचं सांगितलं जात आहे. अतिशय शक्तिशाली अशा या आत्मघातकी स्फोटात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही लाहोरमधल्या ज्या भागात स्फोट झालेत तिथल्या 40 गाड्या नष्ट झाल्यात, तर सुमारे तीन इमारती ढासळल्या आहेत. जवळच असलेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. हल्लेखोर त्याच भागात लपून बसले असल्याचा अंदाजही वर्तवला होता. त्यामुळे या भागात आता लष्कर येऊन दाखल झालं होतं. दरम्यान आसपासच्या शाळेतल्या मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. जखमींवर जवळच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले आहेत. पाकिस्तान लष्काराच्या अधिका-यांनी स्फोटाच्या जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली. लष्काराने स्फोट झालेल्या इमारतीचा ताबा घेतला. तर अर्धसैनिक दल आणि पोलिसांनी या इमारतीला घेराव घातला होता.

close