राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार नाहीच -शरद पवार

October 2, 2014 11:32 PM0 commentsViews: 1068

pawar on modi02 सप्टेंबर : निवडणुकीनंतर राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार नाही, याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केला. आज औरंगाबादमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. तसंच त्यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या कामाचं कौतुकही केलं.

शिवसेना-भाजपची युती तुटली आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने आघाडीशी काडीमोड घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपमध्ये यायचं असेल म्हणून भाजपने युती तोडली असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. भविष्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होईल असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. अनेक राजकीय विश्लेषकांनीही भाजप-राष्ट्रवादी युती होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र शरद पवार यांनी याचं खंडन केलंय. या अगोदर सरकार स्थापन करण्याची वेळ आली होती तेव्हा आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बाजूने होतो. ही आमची पार्श्वभूमी आणि इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही असं सांगत त्यांनी भाजपसोबत जाणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर सारखे आरोप होत असता यावर प्रश्न विचारला असता. पवार म्हणाले, अजित पवार आणि भुजबळ हे अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. घेतलेलं काम ते पूर्ण करतात त्यांच्यात एक प्रभावी नेतृत्व आहे असं कौतुक पवारांनी केलं. तसंच दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला यावर पवारांनी खुलासा केला. जर एखादा अपक्ष उमेदवार जर राष्ट्रवादीच्या कामी येते असले तर त्यांना पाठिंबा का देऊ नये असा सवाल उपस्थित करत अजित पवारांच्या निर्णयाची जोरदार पाठराखण केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close