एशियन गेम्समध्ये भारताचा डबल धमाका

October 3, 2014 11:42 AM0 commentsViews: 2686

kabaddiindia-getty0310-630

03 ऑक्टोबर : दक्षिण कोरियामध्ये सुरु असलेल्या 17 व्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिलांच्या पाठोपाठ पुरुष कबड्डी संघाने विजयादशमीच्या मुहूर्तावर गोल्डन मेडल जिंकत डबल धमाका केला. महिला कबड्डी संघाने शानदार कामगिरी करत इराणच्या संघाचा 31-21 असा धुव्वा उडवला तर पुरुष कबड्डी संघाने 27-25 अशा 2 फरकाने इराण संघाचा पराभव केला आहे. या दोन्ही मेडल्ससह भारताच्या खात्यात आता एकून 11 गोल्ड मेडल्स जमा झाले आहेत.

याआधी चार वर्षांपूर्वी चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एशियन गेम्समध्येही भारतीय महिला संघाने गोल्ड मेडल पटकावलं होतं. तर भारताच्या पुरुष संघानेही गेल्या सलग सहा एशियन गेम्समध्ये प्रत्येक वेळी गोल्डन मेडल जिंकलं आहे.

दुसरीकडे काल (गुरुवारी) भारताच्या महिला धावपटूंनीही सोनं लुटलं. प्रियांका पवार, टिंटू लुका, मनदीप कौर आणि एमआर पूवम्मा या चौघींनी फोर बाय फोर हंड्रेड मीटर रिले रेसमध्ये गोल्डन मेडलची कमाई केली आहे. त्यांनी ही रेस 3 मिनिटं आणि 28.68 सेकंदांत पूर्ण करत नवं रेकॉर्ड रचलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close