पैठणच्या व्हिडिओकॉन इंटरनॅशनल कंपनीचं आगीत प्रचंड नुकसान

May 27, 2009 9:25 AM0 commentsViews: 5

27 मे, पैठण औरंगाबादच्या पैठण रोडवरील चितेगावमधील व्हिडिओकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या प्लास्टिक मोल्डींग प्लांटला शॉट सर्किटने आज भीषण आग लागली. यात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीचं स्टोअर रूम आणि प्लास्टिक मोल्डींगची बिल्डींग यात पूर्णपणे जळली आहे. फायर ब्रिगेडच्या एमआयडीसीतील बजाज, गरवारे कंपन्यांच्या गाड्या, महानगरपालिकेच्या 120 पेक्षा जास्त टँकर आणि गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे. ज्या प्लांटमध्ये आग लागली आहे तिथे 200 लिटर थिनरचे हजारो पिंप आणि एलपीजी गॅस सिलिंडर आहे. त्याच्या स्फोटामुळे आग आणखीच भडकल्याने दोन बिल्डींग मधील सर्व साहित्य जळूनखाग झालं आहे. आग भीषण असल्याने तसंच धुराचे मोठे लोळ उठत असल्याने ती विझवण्यासाठी भरपूर अडचणी आल्या आहेत.

close