पृथ्वीराज चव्हाणांच्या जाहिरातीविरोधात आयोगाकडे तक्रार

October 3, 2014 3:02 PM1 commentViews: 2585

cm prithviraj chavan resign03 ऑक्टोबर : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाहिरातीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. मुख्यमंत्रिपदावर नसताना जाहिरातीमध्ये स्वत:ला मुख्यमंत्री दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे, असं याचिकेत म्हटलंय. औरंगाबादच्या जिज्ञासा प्रतिष्ठाननंही तक्रार केली आहे.

राज्याच्या निवडणुकीच्या जाहिरातींवरून सध्या वेगळं राजकारण सुरू आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ‘महाराष्ट्र नंबर वन’ या टॅगलाईन खाली जाहिरात झळकत आहे. या जाहिरात मुख्यमंत्री प्रगत महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र असं सांगत त्यांनी महाराष्ट्र नंबर एकचा नारा दिलाय. जाहिरातीच्या सरत शेवटी चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आपली सहीही करतात. राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर सरकार अल्पमतात आले आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्या जाहिरातींवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली. अजित पवारांनी जाहिरातीसाठी पैसा कुढून आणला असा सवाल केलाय. राजकीय आरोप होत असले तरी आता या जाहिरातीवर रितसर मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबादेतील जिज्ञासा प्रतिष्ठानच्या वतीनं ही तक्रार करण्यात आलीये. सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री नसतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून स्वत:ला दाखवलं आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली असल्याचं तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • jagjeet

    best

close