मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बस दरीत कोसळली, 2 ठार

October 3, 2014 7:10 PM0 commentsViews: 2006

03 ऑक्टोबर : आज राज्यभरात दसरा सणाचा उत्सव साजरा केला जात आहे मात्र मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका भीषण अपघातात काळाने दोन जणांवर घाला घातलाय. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा ते खंडाळा दरम्यान एसटीची बस 60 फूट खोल दरीत कोसळली. या अपघात 2 जणांचा मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाले. लोणावळा ते खंडाळा दरम्यान पांगोळीजवळ हा अपघात झालाय. बसमधल्या सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलंय. जखमींना पिंपरी-चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

आज दुपारी एमएच -07 -9038 क्रमांकाची एस टीची निम आरामी बस सातार्‍याहून प्रवाशांना घेऊन मुंबईकडे निघाली होती. या बसमध्ये 30 प्रवासी होते. संध्याकाळी 6 च्या सुमारास ही बस लोणावळा-खंडाळा दरम्यान पांचोळी इथं पोहचली असता ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे बस 60 फूट खोल दरीत कोसळली. घटना घडल्यानंतर 30 मिनिटांत पोलीस आणि शिवदुर्ग गिरयारोहक संस्थेचे कार्यकर्ते पोहचले. आणि त्यांनी प्रवाशांना बाहेर काढलं. या बसमधील प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी ही बस सातार्‍याहुन मुंबईकडे निघाली होती. संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबई-एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ पांगोळीजवळ बसला अपघात झाला. बस लोणावळ्याच्या पुढे आली असता ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. सुरुवातील काय घडले हे कुणालाच कळले नाही. अर्ध्यातासात पोलिसांची मदत पोहचली. या अपघातामुळे प्रवाशांना प्रचंड धक्का बसला आहे. काही प्रवासी जखमी अवस्थेतच खिडकीतून बाहेर आले. घटनास्थळी तातडीने पाच ऍम्बुलन्स आणि क्रेन पोहचल्या आहेत. दोन तासांच्या प्रयत्नानंतर बसला सरळ करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलंय. या अपघातात 2 जण ठार झाले. तर 20 जण जखमी झाले. जखमींना पिंपरी-चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

….प्रत्यक्षदर्शीची माहिती
– सातारा बस डेपोची निमआराम बस
– दुपारी 2 वाजून 45 मिनीटांनी सातार्‍यावरून मुंबईला जायला निघाली
– गाडीचे ड्रायव्हर होते आर.डी.शिवथरे
– लोणावळ्याच्या पुढे गाडी आली
– चालकाचं नियंत्रण सुटलं
– बस 60 फूट दरीत कोसळली
– गाडीत अंदाजे 30 प्रवासी
– अपघातानंतर काही प्रवासी जखमी अवस्थेतच खिडकीतून बाहेर आले
– काही वेळात पोलीस घटनास्थळी, बचावकार्याला सुरूवात
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close