दसरा वाद विसरा, मोदी-सोनियांच्या उपस्थिती रावण दहन

October 3, 2014 8:14 PM0 commentsViews: 1885

modi and sonia03 ऑक्टोबर :दसरा सण मोठा आनंदाला नाही तोटा…असं उगाच म्हटलं जात नाही. लोकसभेत एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आज रावण दहनाच्या निमित्ताने एकत्र आले. दिल्लीत सुभाष मैदानावर रावण दहन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी एकाच व्यासपीठावर आले. तसंच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यावेळी उपस्थित होते.

भाजपचे नेते नरेंद्र मोदी विरुद्ध समस्त काँग्रेस असा सामना लोकसभेच्या आखाड्यात अवघ्या देशाने पाहिला. पण आज दिल्लीतल्या सुभाष मैदानावर संध्याकाळी रावण दहन पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून रावण दहन केलंय. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी हजर होत्या. तसंच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे ही कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे दृश्य पहिल्यांदाच पाहण्यास मिळालं. तसंच या प्रसंगी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धनही उपस्थित होते. राष्ट्रपतींनी राम-लक्ष्मणाची पूजा केली. त्यानंतर मोदींनी रावण दहन केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील सुभाष मैदानावर रामलिला समितीद्वारे आयोजित रावण दहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्यात. मोदी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी एकत्र येऊन वाईटाचा प्रतिक रावणाचं दहन केलं. यावेळी दिल्लीकरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close