स्वस्त दरातल्या कर्ज भेटीचे अर्थमंत्रालयाचे संकेत

May 27, 2009 3:52 PM0 commentsViews: 5

27 मे सामान्यांना लवकरच स्वस्त दरातल्या कर्जाची भेट देण्याचे संकेत अर्थमंत्रालयाने दिले आहेत. ज्यामुळे कर्ज घेणार्‍या अनेकांची मोठी सोय होणारेय. राज्यातल्या बँकांनी येत्या 12 जूनपर्यंत कर्जासाठीचे व्याजदर एक ते दीड टक्क्यांनं स्वस्त करण्याचे संकेत दिलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय. 12 जूनला अर्थमंत्री प्रणव मुखर्जी सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत त्याआधी व्याजदरात कपात करण्याचा हा निर्णय अपेक्षित आहे. सध्या पंजाब नॅशनल बँकेचे कर्जासाठी व्याजदर सर्वात कमी आहेत आणि इतर सर्व बँकांही याच पातळीच्या आसपास व्याजदर निश्चित करतील अशी शक्यता आहे. युको बँक, कॉर्पोरेशन बँक, बँक ऑफ राजस्थान आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँका त्यांचे व्याजदर कमी करण्याविषयी विचार करतायत. म्हणजे नव्या अर्थमंत्र्यांकडून लवकरच सामान्यांना स्वस्त दरातल्या कर्जाची भेट मिळू शकणार आहे.

close