फ्रिंज बेनिफिट टॅक्स हटवण्यासाठी अर्थमंत्रायलाचे विशेष प्रयत्न

May 27, 2009 3:54 PM0 commentsViews: 1

27 मे केंद्रात आलेलं नवं सरकार आता सामान्यांना खूश करण्यासाठी एफबीटी म्हणजे फ्रिंज बेनिफिट टॅक्स हटवण्याचा विचार करतंय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या जो एफबीटी लावला जातोय त्यातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे हा टॅक्स रद्दच केला जाईल अशी शक्यता दिसत आहे. कर्मचार्‍यांना दिला जाणारा प्रवास भत्ता, शैक्षणिक खर्च अशा काही भत्त्यांसाठी सरकारकडून हा टॅक्स लावला जातो. मात्र चालू आर्थिक वर्षात सरकारकडे येणार्‍या प्रत्यक्ष कराच्या उत्पन्नात फ्रिंज बेनिफिट टॅक्समधून मिळणारा महसूल दोन टक्क्यांपेक्षाही कमी करण्यात आला आहे. तसंच फ्रिंज बेनिफिट टॅक्सच्या व्यवस्थापनासाठी त्यातून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत असल्यामुळे सरकार हा निर्णय घेऊ शकतं असं सूत्रांनी सांगितलंय. पी.चिदंबरम यांनी 2005 सालच्या बजेटमध्ये या टॅक्सचा प्रस्ताव मांडला होता आणि 2006 च्या आर्थिक वर्षापासून हा टॅक्स लागू करण्यात आला होता.

close