विद्यापीठ अनुदान आयोगाची रॅगिंगविरूद्धची नियमावली तयार

May 27, 2009 4:01 PM0 commentsViews: 3

27 मे विद्यापीठ अनुदान आयोगाने आता रॅगिंगविरुद्धची नियमावली तयार केली आहे. रॅगिंगप्रकरणी दोषी असलेल्या विद्यार्थ्याला डीबार केलं जाणार आहे. तर अडीच लाख रुपयांपर्यंत दंडही केला जाणार आहे. रॅगिंग ग्रुपनं केलं असेल तर त्या संपूर्ण ग्रुपलाही शिक्षा करण्याची तरतूद या नियमांमध्ये आहे.रॅगिंगची तक्रार दाखल झाल्यापासून संबंधित संस्थेच्या प्रमुखाला पंधरा मिनिटात त्याची माहिती देणंही बंधनकारक असेल. तर देशपातळीवरही एक मोफत हेल्पलाईनही पंधरा जूनपासून सुरू केली जाणार आहे.

close