आज सभा’वॉर'; मोदी विरूद्ध पवार,चव्हाण, ठाकरे रणागंणात

October 4, 2014 12:00 PM0 commentsViews: 2589

sabha war04 ऑक्टोबर : नवरात्र उत्सवाची सांगता झाल्यानंतर आता राजकीय नेते प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे. आजचा शनिवार खर्‍या अर्थाच सभावॉर ठरणार आहे. भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यात प्रचाराला सुरूवात करणार आहे. त्याचपाठोपाठ टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्याही सभा होणार आहे. नरेंद्र मोदी राज्यात एकूण 22 सभा घेणार आहे या आपल्या 22 सभांपैकी पहिला सभाही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमध्ये होणार आहे. 6 मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा असणार आहे. तसंच गोपीनाथ मुंडेंच्या निधनानं रिक्त झालेल्या लोकसभेसाठी डॉ. प्रितम मुंडे- खाडे यांच्या प्रचारासाठीही मोदींची सभा होती आहे. विधानसभेसाठी परळीमधून पंकजा मुंडे- पालवे, विनायक मेटे बीडमधून, गेवराईमधून लक्ष्मण पवार, आष्टीमधून भीमराव धोंडे आणि केजमधून संगीता ठोंबरे आणि माजलगाव आर टी देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. त्यामुळे आज कार्यकर्त्यांची जमावाजमवी आणि जनतेला भरपूर भाषणांची मेजवानी मिळणार आहे.

कुणाच्या किती सभा ?

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील प्रचाराला सुरूवात
बीडमध्ये होणार पहिली सभा दुपारी 1 वाजता
औरंगाबादमध्ये संध्याकाळी 5 वाजता तर
मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरही रात्री 8 वाजता होणार सभा

-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सभा
– शरद पवार यांच्या आज सातार्‍यात 2 सभा
– पाटणला 11 वाजता तर वाईला 1.30 वाजता सभा

- अजित पवार सभा
– पुण्यात दुपारी 4 वाजता बालेवाडी स्टेडियमवर अजित पवार आणि सुनील तटकरेंची प्रचारसभा

नारायण राणे
पुण्यात नारायण राणेंची संध्याकाळी 7 वाजता सभा

- उद्धव ठाकरेंच्या विदर्भात 3 सभा
अकोल्यात दुपारी 12 वाजता
दुपारी 3 वाजता बुलडाण्यात
संध्याकाळी 5 वाजता अमरावतीत सभा

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाणांची बुलडाण्याचा वरकट बकालमध्ये दुपारी 12 वाजता
आणि नंतर अकोल्यातील आकोटमध्ये सभा

नितीन गडकरी
आज सिंधुदुर्गच्या कणकवली आणि सावंतवाडीमध्ये नितीन गडकरींची सभा
– रत्नागिरी आणि गुहागरमध्येही सभा
– कणकवलीत सकाळी 11 वाजता सभा

राज ठाकरे
राज ठाकरेंच्या आज नांदेडमध्ये 2 सभा
लोह्यात दुपारी 3 वाजता
नांदेड शहरात संध्याकाळी 5 वाजता सभा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close