…तर पालिका निवडणुकीत मत मागायला येणार नाही -अजित पवार

October 4, 2014 12:19 PM4 commentsViews: 4071

Ajit Pawar PC04 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत:ला 100 दिवसांचं टार्गेट दिलंय. जर 100 दिवसांत काम पूर्ण केलं नाही तर मत मागायला येणार असं जाहीर आश्वासन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रचार सभातून देत आहेत.

  कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेत अजित पवार म्हणतात, जर राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर आली तर 100 दिवसांत टोल बंद करू असं आश्वासन दिलं. तर दोनच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्न 100 दिवसांत सोडवेन अन्यथा आगामी काळात होणार्‍या महापालिका निवडणुकांसाठी मत मागायला येणार नाही असं वक्तव्य पवारांनी केलं होतं. भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार, विलास लांडे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पिंपरी चिंचवड शहरात दीड लाख अनधिकृत बांधकामे उभी आहेत, त्यांना नियमित करण्यासाठीचा प्रस्ताव मागील 25 वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र पिंपरी महापालिकेवर एक हाती सत्ता असताना आणि 15 वर्ष राज्याच्या सत्तेत वाटेकरी असणार्‍या अजित पवार हा प्रश्न का सोडवू शकले नाही, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय. मात्र अजित पवार यांचं विधान हे केवळ वल्गना आणि दिशाभूल करणारं असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Rahul Kamble

  अगोदर सिंचनाचे ७५,००० कोटी वापस करा
  धरणामध्ये लाघवी करण्याची भाषा सोडूण द्या

 • aamadmi

  सगळ्यांना फेकू रोग झाला आहे, साहेब आता घरी बसा. इतिहास खरा ठरणार आहे , महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. पद सोडा पक्षात पण स्थान राहणार नाही , सत्ता नसताना कोणी साथ देत नाही हे कळेलच काही दिवसात. विरोधी पक्ष सोडा तुम्ही काँग्रेसवरच टीका करताना दिसत आहे, त्यामुळे चव्हाण म्हणाले त्यात तथ्य आहे. शेतकरीसुद्धा आत्महत्या करताना लिहून गेले आहेत राष्ट्रवादीला मतदान करू नका … दादा बुरे दिन आने वाले है !

 • aamadmi

  सगळ्यांना फेकू रोग झाला आहे, साहेब आता घरी बसा. इतिहास खरा ठरणार आहे ,
  महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. पद सोडा
  पक्षात पण स्थान राहणार नाही , सत्ता नसताना कोणी साथ देत नाही हे कळेलच
  काही दिवसात. विरोधी पक्ष सोडा तुम्ही काँग्रेसवरच टीका करताना दिसत आहे,
  त्यामुळे चव्हाण म्हणाले त्यात तथ्य आहे. शेतकरीसुद्धा आत्महत्या करताना
  लिहून गेले आहेत राष्ट्रवादीला मतदान करू नका … दादा बुरे दिन आने वाले
  है !

 • Mahadev Patil

  आता पाऊस पण बर्‍यापैकी झाला आहे तेव्हा पोपोटभर पाणी प्या आणि अशी $$$ करा कि100 तासात अरबी समुद्रात पोचला पाहिजे दादा

close