चारही पक्षांची आपापसात सेटिंग -राज ठाकरे

October 4, 2014 12:48 PM0 commentsViews: 3676

raj thackarey jalna sabha04 ऑक्टोबर : विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चारपक्षांमध्ये आपापसात सेटिंग आहे असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. शुक्रवारी जालन्यात प्रचारसभेत ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मराठवाड्यात तीन सभा घेतल्या. जालना इथं झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी चारही पक्षांवर निशाणा साधला. मला इतरांसारखा पक्ष नाही चालवायचा. विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे आमदार काय काम करता ये एकदा येऊन पाहाच. या चार पक्षांचे आमदार एकमेकांमध्ये तोडपाण्या करत असतात. विधानसभेत प्रश्न उभा करायचा प्रश्न उभा केला की मंत्री घाबरतो. मग दुपारी त्याच मंत्र्यांच्या केबिनमध्ये जाऊन ही लोकं पैशांची सेटिंग करता.जो प्रश्न उभा केला तो तिथेच संपला आणि जगाला सांगतात बघा आम्ही काम केलं असा खोटा ठेंभाही मिरवतात असा आरोप राज यांनी केला. तसंच जागतिक बँकेच्या अहवालानूसार मराठवाड्याला येणार्‍या चाळीस वर्षात वाळवंटाचं स्वरूप येईल. एक दोन आमदार नव्हे तर मला सत्ता द्या मराठवाड्याचा दुष्काळ भुतकाळात बदलेन असं आश्वासनही राज ठाकरेंनी दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close