भाजपच्या जाहिरातीतून महाराष्ट्राचा अपमान -शरद पवार

October 4, 2014 8:48 PM2 commentsViews: 3217

2pawar_on_lavasa04 ऑक्टोबर : भाजप आपल्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्र अत्यंत वाईट राज्य आहे असं दाखवत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं. सातार्‍यात राष्ट्रवादीची प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

आज (शनिवारी) सातार्‍यातील पाटणमध्ये राष्ट्रवादीची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उपस्थित होते. या सभेत पवारांनी भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप नोंदवला.

भाजप आपल्या जाहिरातीतून महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. मला समजत नाही ही लोकं महाराष्ट्राची बदनामी का करतायत ? महाराष्ट्र एक उद्‌ध्वस्त झालेलं राज्य आहे असं दाखवणं हा अपमान आहे अशी टीका पवारांनी केली तसंच जर तुम्हाला मत मागायची असेल तर कार्यक्रमांच्या माध्यमातून मतं मागा असा सल्लाही पवारांनी दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Rameshwar Waghmare

    BJP जे खर आहे ते बोलत आहे तुम्ही महाराष्ट्र राज्यातील लोकांची फसवणूक केली 15 वष्रे सत्ता दिली काय केले महाराष्ट्र राज्य लुटले आहे फक्त आम्हाला विकास हवा आहे… हे फक्त मोदी सरकार करू शकते

  • ranjit

    खरे बोलले की राग येतो

close